आवलकोंडा सोसायटीवर व्यंकटराव पाटील यांचे पॅनल विजयी
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी अवलकोंडा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा शरदचंद्रजी पवार विचार मंचचे उदगीर तालुका प्रमुख व्यंकटराव पाटील अवळकोंडकर यांच्या पॅनेलने प्रचंड फरकाच्या मत आधिक्याने विजय मिळवला आहे. यामध्ये विजयी उमेदवार सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी या मतदारसंघातून खर्डेकर दत्ता नारायण, जाधव अभंग तानाजी, पाटील व्यंकटराव नामदेवराव, बिरादार ज्ञानोबा-तुकाराम, बिरादार बापूराव व्यंकटराव, बिरादार श्रीधर वामनराव, मुंडकर दासराव दिगंबर, मुस्कावाड दीपक जनार्धन, महिला प्रतिनिधी गटातून बीरादार लक्ष्मीबाई व्यंकटराव आणि साळुंके भामाबाई जनार्दन तसेच अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून गायकवाड दिगंबर पुंडा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून गुंडरे विष्णुदास निशिकांत, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून भूसणवाड दत्ता प्रल्हाद हे विजयी झाले आहेत.
त्यांच्या या विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठा आनंद, उत्साह निर्माण झाला आहे. व्यंकटराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सक्रिय असून त्यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन स्वतंत्र ताकत लावून आपल्या पॅनलला विजयी करून दाखवले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले जात आहे.
