शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील यशवंत विद्यालयाचे नेत्रदीपक यश

शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील यशवंत विद्यालयाचे नेत्रदीपक यश

अहमदपूर (गोविंद काळे) : मार्च दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेत यशवंत विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण संपादन केले असून यशाची नेत्रदीपक परंपरा कायम केले आहे. या विद्यालयातून 654 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी650 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेतून 90 %च्या पुढचे विद्यार्थी 171आहेत. त्यात विशेष प्रावीण्यासह 407,
प्रथम श्रेणी 172, द्वितीय श्रेणी 69, तृतीय श्रेणी 02,
असून शाळेचा शेकडा निकाल 99.38 असा विक्रमी लागला आहे.
शंभर टक्के गुण घेणारे विद्यार्थी मानसी भाऊसाहेब पवार ,शिवम वैजनाथ पौळ ,कौस्तुभ ज्ञानोबा ईप्पर, संस्कार घनश्याम स्वामी ,अथर्व शिवानंद भारती, प्रसाद ज्ञानदेव केंद्रे आहेत. या गुणवंताचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करण्यात आला.
या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, उमाकांत नरडेले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!