रवींद्रनाथ टागोर विद्यालयाचे शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश

रवींद्रनाथ टागोर विद्यालयाचे शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश

अहमदपूर (गोविंद काळे) : माहे मार्च- एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (s s C.) परीक्षेचा निकाल आज दिनांक 17 रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाइन प्रक्रियेद्वारे जाहीर झाला असून यात रवींद्रनाथ टागोर विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत शाळेचा निकाल 99.24% लावून अल्पावधीतच गरुड झेप घेत दैदीप्यमान यश संपादित केले. शाळेतील २६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. पैकी २६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. व काही अपरिहार्य कारणामुळे ०३ विद्यार्थ्याचे अनुपस्थितीमुळे शाळेचा निकाल९९.२४% लागला आहे. यात गरुड श्रद्धा पुंडलिक ९९.६०% प्रथम, होके समाधान लक्ष्मण९९.४०% द्वितीय, तर गीते विशाल विठ्ठल ९७.६०% गुण प्राप्त करून प्रत्यय आला असून विशेष प्रावीण्यासह 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे ९१ विद्यार्थी आहेत. तर प्रथम श्रेणी 150 विद्यार्थ्यांनी गुण संपादित केले. द्वितीय श्रेणीत 25 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सेक्रेटरी तथा मु.अ. विक्रमसिंह दोडके पाटील, समन्वयक श्रीहरी पवार, उपमुख्याध्यापक निळकंठ सकनुरे, पर्यवेक्षक गिरीराव शिरसागर, आर एस पाटील, सागर राजपूत, रफिक शेख, तुकाराम देवकते, अंकुश खुडे, कृष्णा मुंढे,बिरादार के.एच, वनंजे आर व्ही, श्रीमती शेख मॅडम, दीक्षित एस के, कांबळे मॅडम, आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!