माजी.खा.डाॅ.जनार्दन वाघमारे सरांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल भरत चामले यांनी केले अभिनंदन
उदगीर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट तर्फे ३४वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर झाला. राजर्षी शाहू महाराज जयंती दिवशी २६ जूनला सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण होणार असून. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ उदगीरचे चेअरमन भरत चामले यांनी सरांच्या घरी आदरातिथ्य भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आणि यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं, “त्यांना हा पुरस्कार शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाचे ‘सन्मान फलित’ आहे.”
या वेळी सुमठाण्याचे माजी सरपंच बाबुराव आंबेगावे,चांदेगावचे माजी सरपंच बापूराव बिरादार आदी उपस्थित होते.
