डॉ. युवराज सारणीकर यांचा दयानंद कला महाविद्यालयात सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. युवराज सारणीकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याबद्दल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ युवराज सारणीकर हे दयानंद विज्ञान महाविद्यालय मागील २३ वर्षांपासून कार्यरत आहेत. नेट परिक्षा उत्तीर्ण असून दयानंद विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून २०११ पासून कार्यरत आहेत. तसेच दयानंद माजी विद्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
या सत्कार प्रसंगी उपप्राचार्य अनिल कुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद माने, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे डॉ. प्रदीप सूर्यवंशी डॉ. संदीप जगदाळे प्रा. विजय मांदळे, प्रा आशाकांत भालेराव, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भलेराव आदी उपस्थित होते.
