मातृभूमी प्रतिष्ठान तर्फे योग दिन उत्साहात साजरा – मातृभूमीच्या विद्यार्थ्यांनी केला दररोज योग करण्याचा संकल्प
उदगीर : दररोज सकाळी योग करून निरोगी राहण्याचा संकल्प मातृभूमी महाविद्यालय, मातृभूमी नर्सिंग स्कूल, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व सी-डॅक कॉम्पुटर च्या विद्यार्थ्यांनी केला. मातृभूमी प्रतिष्ठान तर्फे मातृभूमी महाविद्यालात आंतरराष्ट्रीय योग दिन ता २१ मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक प्रा उषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगितले, योग दहा हजार पेक्षा जास्त वर्षापासून प्रचलित आहे. सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. रोज योगा केल्याने आपल्या जीवनातील ताण तणाव नाहीसा होतो. त्यासोबतच मानवाचे शरीर निरोगी राहते. म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी स्वतः योग करावाच व आपल्या कुटुंबियांना सुद्धा योग करण्यासाठी प्रवृत्त करावे आसा संकल्प विद्यार्थ्यांनी केला .
या योग दिनी वृक्षासन , वज्रासन , पादहस्तासन , अर्ध चक्रासन , त्रिकोणासन , भद्रासन , उत्तानमंडूकासन , वक्रासन , सेतु बंधासन ,शवासन आदी योग कसे करावयाचे याचे प्रात्याक्षित स्वाती खोंडे यांनी करून दाखविले .
प्रा बिभीषण मद्देवाड यांनी प्रास्तविक , प्रा उषा साताळकर यांनी आभार मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतिश रे. उस्तुरे , जिल्हाघ्यक्ष भा.ज.पा अनु.जा.मोर्चा लातुर ग्रामीण बालाजी गवारे, तालुका अध्यक्ष भा.ज.पा वसंत शिरसे , पत्रकार माधव घोणे , प्रा रणजीत मोरे , प्रा सय्यद उस्ताद , नंदकिशोर बयास , श्री देवा डोंगरे , ओंकारे जगदीशा, अमृता चौधरी , प्रा आत्तार हमीद , पोतदार अंबादास,पटेल मुबारक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
