समाजातील दातृत्वाची वृत्ती वाढावी – आचार्य गुरुराज स्वामी
अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्या देशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती झालेली आहे पण समाजातील लोक एकमेकांचे पाय ओढणे मध्ये व्यस्त असल्याचे सांगून समाजातील समता विषमता दूर करण्यासाठी दातृत्वाची वृत्ती वाढली तर मंदिर संस्थानातील अन्नछत्र चांगल्या पद्धतीने चालतील त्यासाठी भक्तांनी सकारात्मक मदत व प्रयत्न करावेत असे जाहीर आव्हान भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले. ते दि. 15 रोजी भक्ती स्थळ येथे गुरु पालखी महोत्सवाच्या निमित्ताने भक्तासाठी अन्नछत्रा च्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शि. भ. प. भगवंतराव पाटील चांबरगेकर, सचिव सुप्रियाताई घोटे, सदस्य शिवप्रसाद कोरे, सदस्य मन्नमथप्पा पालापुरे, सौ. शीलाताई शेटकर, एडवोकेट बाबुराव देशमुख, धन्यकुमार शिवणकर सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की पुरातन काळी अन्नक्षेत्रा चा उपयोग विद्यार्थी, गोरगरीब,सं न्यासी, साधू, यात्रेकरू, निराश्रित व इतर गरजू लोकांना नेहमीच होत असल्याचे सांगून भक्तांनी या कार्यासाठी भरीव प्रमाणात सीधा व धनधान्याच्या स्वरूपात मदत करावी असे सांगितले. आजचे अन्नछत्र श्वेत पाटील मोगरगे यांच्या मदतीने करण्यात आले. अन्नछत्रे यशस्वी करण्यासाठी अन्नछत्रा चे प्रमुख मन्मथ बिराजदार विठ्ठलराव गुडमे, ओमप्रकाश पुणे, गुंडप्पा तत्तापुरे, अश्विन आंधळे, सचिन काडवादे सह अन्नछत्रा च्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरचे अन्नछत्र 11 ते 2 आणि सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान चालणार आहे.
