यशवंत विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

यशवंत विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : सद्यस्थितीला देशामध्ये लाइफस्टाइल चेंज झाल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून निरोगी जीवन जगण्यासाठी सकाळच्या सत्राची सुरुवात योगा, प्राणायाम, ध्यानधारणाने करा असे आग्रही प्रतिपादन न्यायाधीश एस एस तोंडचीरे यांनी केले. दि. 21 रोजी आंतरराष्ट्रीय आठवा योग दिनाच्या निमित्ताने यशवंत शैक्षणिक संकुलात आयोजित योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी योगपिठावर प्राचार्य बी एम मुगळे मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले योग शिक्षक गौरव चवंडसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग शिक्षक गौरव चवंडा यांनी योग प्रात्यक्षिक करून करे योग रहे निरोग हा संदेश घराघरात राबवा असे जाहीर आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात श्री व्ही व्ही गंपले म्हणाले की शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत योग करून मनोबल वाढवा असे सांगितले. शिबिराचा शुभारंभ योग्य गीताने करण्यात आला. शिबिराचे प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन के डी बिराजदार यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मानले. या शिबिराला उपप्राचार्य प्रा. बालाजी गोडभरले उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, योग प्रेमी पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!