पु. अहिल्यादेवी मध्ये योग दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.योगदिनानिमित्त सौ वृषाली चवळे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिके करून दाखविले व करून घेतले. याप्रसंगी प्राचार्या रेखाताई तरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दैनंदिन जीवनात सर्वांनी योगांचा अंगीकार करावा सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांसाठी योगा अतिशय उपयुक्त आहे.जो नियमित योगासने करतो तो दीर्घकाळ निरोगी जीवन जगतो.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदीप रेड्डी यांनी प्राथमिक योगासनांचे महत्त्व विषद केले.तर योगगुरू सौ वृषाली चवळे यांनी अतिशय आकर्षक रीतीने विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिके करून दाखविले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
