मानखेड येथील शेतकरी कुटुंबास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 11 हजार रुपयांची घरपोच मदत
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मानखेड येथील शेतकरी स्व.संतुकराव कोंडीबा सांगुळे व त्यांच्या पत्नी कलुबाई संतुकराव सांगुळे यांचा मृत्यू झाला होता.अचानक आई वडील वारल्याने त्यांचे चिरंजीव शेतकरी पांडुरंग संतुकराव सांगुळे यांच्यावर पूर्ण परिवाराची मोठी जिम्मेदारी पडली.त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने बीबीयाने,खत यांच्या दुप्पट किंमती, पेरणीचा खर्च आदी तोंडावर आला आहे. या सर्व परिस्थिती ची जाणीव ठेवत मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी “चला देऊ मदतीचा हात कोविडमुळे मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबियांच्या जीवनात” या त्यांच्या उक्तीनुसार सांगुळे परिवारास 11 हजार रुपयांची घरपोच मनसे मदत केली. यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष उल्हास पाटील, उत्तम मुरकुटे, विभागाध्यक्ष गजू पांगरे, मा. शहराध्यक्ष अतिष गायकवाड, विजयकुमार भिकाणे सर, रवी पाटील, रणजित सांगुळे, सुभाष कांबळे आदींसह मानखेड सोनखेड येथील नागरिक उपस्थित होते.
