स्वामी विवेकानंद महाविद्यालयात आंतररष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात आंतररष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बाळासाहेब जाधव इनडोअर स्टेडियम मध्ये आज आंतररष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने, महेश अर्बन बँकेचे संचालक पुरुषोत्तम पुरोहित, एस.आय.सी. अहमदपूर शाखेचे अधिकारी होलंबे सर, ज्येष्ठ खेळाडू माधव वलसे, स्वाराती विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक, महाविद्यालयाचे क्रीडा विभाग संचालक डॉ. भास्कर माने मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून योग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे डॉ. गोविंद काळे आणि डॉ. भास्कर माने यांनी योग, प्राणायाम, व्यायामाचे महत्त्व सांगताना भारतीय परंपरेचा थोडक्यात इतिहास सांगितला. निसर्गाच्या सानिध्यात जावून शुद्ध हवेचा अधिकाधिक वापर करून जीवन सुखी, समाधानी समृध्द जगण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कू. ऋतुजा भास्कर माने हिने वेगवेगळ्या योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिरूर व अहमदपूर परिसरातील क्रीडा प्रेमी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!