राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : देशातील आरक्षणाचे जनक, बहुजनांच्या मुला मुलींना शाळेत न घालणाऱ्या पालकांना दंड लावणारा लोकराजा, बहुजनांच्या मुला मुलींना शिकण्यासाठी वसतिगृहाची सोय करून देणारे कर्ते सुधारक, समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्याचा महान उपासक, सत्यशोधक, क्रांतिकारक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून आज येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा स्वा. रा. ती. विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, श्री. सावते उपस्थित होते. तर डॉ. दामाजीवाले एम. डी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आभार डॉ. बी. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी राजू कदम तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
