महात्मा फुले महाविद्यालयात आज लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांवर आंतराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

महात्मा फुले महाविद्यालयात आज लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांवर आंतराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २५ जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘ लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज ‘ या विषयावर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे भूषविणार असून या चर्चासत्राचे उद्घाटन जर्मनी येथील लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज या विषयाचे अभ्यासक मनीष हटवर हे करणार आहेत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर, बीजभाषक म्हणून महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक डॉ. व्ही. एल. एरंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या निबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. नारायण कांबळे हे भूषविणार असून या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. बळीराम पवार, डॉ. एस. जी. अन्सारी व दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथील प्राचार्य डॉ. सविता मिश्रा हे शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय ई – चर्चासत्रात आभासी पद्धतीने अधिकाधिक अभ्यासक, प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व संयोजक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!