ग्रामीण भागातून देखील भाजपकडे ओढा

ग्रामीण भागातून देखील भाजपकडे ओढा

उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर तालुक्यातील हकनाकवाडी व उदगीर शहरातील समतानगर भागातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश झाला आहे.
सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे कणखर नेतृत्व ना.नरेंद्रजी मोदी यांची विकासकामे व राष्ट्रनिष्ठा पाहून प्रेरित झालेल्या उदगीर तालुक्यातील हकनाकवाडी व शहरातील समतानगर भागातील तरुण,ज्येष्ठ, कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षातर्फे करीत असलेल्या जनसेवेच्या कामावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या उदगीर तालुका अध्यक्षपदी श्री.संग्राम पवार यांची निवड करण्यात आली.उदगीर शहरातील समता नगर भागातील श्री.राहुल निटुरे ता.भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी, श्री.चेतन कुंभारे भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या सर्वांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी शहरअध्यक्ष श्री.मनोज पुदाले,माजी उपनगराध्यक्ष श्री.सुधीर भोसले,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा लातूर जिल्हा अध्यक्ष श्री.बालाजी गवारे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटोदे,उदगीर भाजपा माजी ता.अध्यक्ष श्री.वसंत शिरसे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा लातूर प्रभारी श्री.अमर बोऱ्हाडे,माजी नगरसेवक श्री.आनंद बुंदे,माजी नगरसेवक श्री.रामेश्वर पवार उदगीर भाजपा युवा मोर्चा शहरअध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,ता.सरचिटणीस नवज्योत शिंदे,श्री.राम जाधव,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस श्री.आनंद भोसले,भाजपा युवा मोर्चा चिटणीस श्री.मंगेश येरकुंडे,श्री.विनायक सुर्यवंशी,या वेळी ज्येष्ठ नागरिक,तरुण बांधव,कार्यकर्त,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!