दहा लाख रूपये किंमतीची नाली बांधकाम आणी रोड क्राॅसींग कामाचा शुभारंभ

दहा लाख रूपये किंमतीची नाली बांधकाम आणी रोड क्राॅसींग कामाचा शुभारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील बौध्द नगर समोरील पोलीस क्वार्टर शेजारील ईदगाह रस्ता बाजूची मोठी नाली तसेच बौध्द नगर अंतर्गत रस्त्यावरील नाली क्राॅसींग कामाचा शुभारंभ युवक नेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते नूकताच संपन्न झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत आनंदवाडी रोड पोलीस स्टेशन संरक्षीत भिंत लगतचे नाली बांधकाम तसेच बौध्द नगर अंतर्गत रस्त्यावरील नालीवरील क्राॅसींग च्या काम प्रलंबीत होते. नगरसेविका सौ.तनूजाताई सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी या साठी दहा लाख रुपये मंजूर करून घेतले होते. याबद्दल गटनेते फूजैल जागीरदार या सह पालीकेच्या सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभले होते. सदरच्या मंजूर कामाची निविदा प्रक्रीया झाली असून या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी रहीमखान पठाण,शेख अय्याजभाई, जावेदभाई बागवान, शेख जीलानी, शिवदास कांबळे, सूभाबाई लांडगे, सय्यद एजाजभाई, भगवानराव ससाणे, सूर्यकांत कोकाटे, अल्लाबक्ष तांबोळी, संविधान कदम, अलमूभाई, मनोहर गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!