सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे गीत गायन स्पर्धा संपन्न

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे गीत गायन स्पर्धा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, रुद्धा येथे मराठी गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यानी उत्स्कुर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी वेग – वेगळी बाल गीतं आणि भावगीते गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय संचालक व संचालिका श्री. कुलदीप हाके व सौ. शिवालिका हाके हे आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थांना प्रोत्साहित करण्यासाठी शुभांगी सुर्यवंशी, ज्योत्स्ना स्वामी, स्नेहा ओझा, वैजनाथ धुळगुंडे, भरत कानवते, शुभम पोले, ऋतिक पोले, राम भोंग, इत्यादींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच सूत्रसंचालन भरत कांनवटे यांनी केले तर आभार शाळेच्या प्राचार्या सौ.रुथ चक्रणारायण यांनी मानले. तर केशव तोंडारे, अंगद, भागवत, चंद्रकला काडवादे इत्यादींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!