पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते पैलवान मुरलीधर मुंडे यांना “विशेष गौरव” पुरस्काराने सन्मानित
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : येथील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांना दैनिक मराठवाडा साथीच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा “विशेष गौरव” पुरस्काराने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून अभिनंदन होत आहे.
शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे शनिवार,दि.06 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते पै.मुरलीधर मुंडे यांना सन्मानपत्र देऊन विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आ.संजय दौंड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चंदुलाल बियाणी यांच्यासह आदीच्या प्रमुख उपस्थिती होती. तसेच भागवतराव मुंडे, बालासाहेब लाड, प्रकाश मुंडे, मोहन मुंडे, माऊली मुंडे, मुक्तराम कराड, प्रशांत कराड, मुंजा कराड, विनायक कराड आदी उपस्थित होते.
जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळेचे संस्थापक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा श्री.तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे संस्थापक पैहलवान मुरलीधर भागवतराव मुंडे यांनी व्यायाम शाळेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून तसेच क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. यापूर्वी ही त्यांनी केलेल्या कुस्ती व क्रीडा क्षेत्रातील कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत.यामध्ये एकता गौरव पुरस्कार, राजस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय कुस्तीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. सामाजीक, शैक्षणिक, दुग्धव्यवसाय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त यावर्षीचा सन 2021 साठीचा “विशेष गौरव” पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र , शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी मुंडे म्हणाले की, मिळालेला पुरस्कार माजी सामाजीक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढवीत आहे तसेच ते माझा उत्साह वाढवीत मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत असल्याचे मत त्यांनी बोलतांना व्यक्त केले. विशेष गौरव पुरस्काराने पैलवान मुरलीधर मुंडे यांना प्रदान झाल्याबद्दल शैक्षणीक, सामाजिक, राजकीय क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून अभिनंदन होत आहे.