पाच हजारांची लाच पल्लवीस पावली, एसीबीच्या जाळ्यात अलगदच अडकली

पाच हजारांची लाच पल्लवीस पावली, एसीबीच्या जाळ्यात अलगदच अडकली

पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेविकेस रंगेहात अटक

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील मौजे चांडेश्वर ग्रामपंचायत हद्दी मध्ये तक्रारदार (वय 34) त्यांचे मित्र यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची 8 अ ला नोंद करण्याच्या कामासाठी बाबासाहेब शिवाजी गायकवाड (वय 40) विभागीय आरोग्य कार्यालय येथे शिपाई या पदावर व पल्लवी दशरथ घाडगे (वय 29) ग्रामसेवक चांडेश्वर रा. महाराणा प्रताप नगर यांच्या समक्ष सगळ्यांचे मिळून फेरफार व घरपट्टी ची फी दहा हजार रुपये व फी व्यतिरिक्त दहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. दि. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचत ग्रामपंचायत कार्यालय चांडेश्वर येथे ग्रामसेवक पल्लवी घाडगे व बाबासाहेब गायकवाड यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड परिक्षेत्राच्या कल्पना बारवकर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी पार पडली.

About The Author