स्मार्ट व्हिलेज कव्ह्याच्या सरपंचपदी पद्मिन सोदले

उपसरंपचपदी किशोर घार यांची दुसर्यांदा वर्णी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज कव्ह्याच्या सरपंचपदी पद्मिन ज्ञानोबा सोदले तर उपसरपंचपदी किशोर भानुदास घार यांची निवड करण्यात आलेली आहे. भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, शिक्षकतज्ज्ञ गोविंदराव घार, युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलने 11 जागेवर एकतर्फी विजय मिळाला त्या विजयी उमेदवारामधून निवडणूक निर्णय अधिकारी आर.डी.मठपती यांच्या उपस्थतीत नुतन सरपंचपदी पद्मिन ज्ञानोबा सोदले यांची तर उपसरपंचपदी किशोर भानुदास घार यांच्यासह नऊ सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे.
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी गेल्या 40 वर्षामध्ये कव्हा या गावचा चौफेर विकास केलेला आहे. त्यामुळे या कामाची पावती म्हणून कव्हेकरांनी स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलला एकतर्फी विजय मिळवून देण्याचे काम केलेले आहे. या विजयी उमेदवारांतून 4 फेब्रुवारी 2021 रोजी 11.45 च्या सुमारास स्मार्ट व्हिलेज कव्ह्याच्या सरपंचपदी पद्मिन ज्ञानोबा सोदले यांची तर उपसरपंचपदी किशोर भानुदास घार यांची निवड करण्यात आलेली आहे. सर सदस्यांमध्ये शिवशरण गदगेअप्पा थंबा, सदाशिव गणपती सारगे, नेताजी तुकाराम मस्के, नामदेव धोंडीराम मोमले, आनिता मोहन घोडके,कांचन कमलाकर होळकर, नाजीमा रसूल पठाण, पुजा दत्तात्रय मामडगे, पूनम गोपाळ सारगे, अशा एकून 09 जणांचा समावेश आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, शिक्षकतज्ज्ञ गोविंद घार, युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, एम.एन.एस.बॅँकचेे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन बालाजी घार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भागवतराव घार, प्रा.अशोकराव पाटील, अजित घार, रंजितसिंह पाटील कव्हेकर, निळकंठराव पवार, बद्रुदिन शेख, दिनानाथ मगर, जेष्ठ नागरीक कांताप्पा पाठणकर, भास्कर होळकर, गोरख सारगे, गोरोबा मगर,रणवीर उमाटे, अर्जुन कोळी, अमोल जमादार, गोविंद सोदले, विजय कदम, विश्वंभर घार, संतोष घायाळ, महादेव कांबळवाड, दिनानाथ मगर, ज्ञानोबा सारगे, सुनिता सारगे, राजकुमार वाले, तस्लिम सय्यद, उत्तम खंडागळे, बालाजी वंटेेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
कव्हा हे गाव राज्यात आदर्श ठरेल
लातूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज कव्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी आता नवीन टिम मिळालेली आहे. यापुर्वीही भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी स्मार्ट व्हिलेज कव्हा गावचा चौफेर विकास केलेला आहे. परंतु राहिलेल्या विकासाला गती देण्यासाठी ही नवीन टिम तयार केली असून या माध्यमातून होणार्या चौफेर विकासामुळे कव्हा हे गाव भविष्यामध्ये राज्यात आदर्श ठरेल, अशी अपेक्षा कव्हेकरांकडून व्यक्त केली जात आहे.