गुणवंतांची खाण दयानंद कलाची शान
दयानंद कलाचे 07 विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत
लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.ए. उन्हाळी पदवी परीक्षेत दयानंद कला महाविद्यालयाच्या 07 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. दयानंद कला महाविद्यालयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकतात. म्हणूनच दयानंद कला महाविद्यालयास ‘गुणवंतांची खाण दयानंद कलाची शान’ असे म्हणतात.
विद्यापीठाने उन्हाळी 2020 मध्ये पदवी परीक्षांचे आयोजन केले होते. या परीक्षेत दयानंद कला महाविद्यालयाच्या बी. ए. तृतीय अॅडमिनीस्ट्रेशनच्या कु. अनुराधा सतीश मडजे या विद्यार्थिनीने 84.06% गुण प्राप्त करून विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे, तर याच विभागातील अजय बालाजी दाडगे या विद्यार्थ्यांने 82.17% गुण प्राप्त करून विद्यापीठात सर्वद्वितीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. तसेच 82.03% गुण घेऊन कु. कोमल शिंदे ही विद्यार्थीनी विद्यापीठात सर्वतृतीय आली आहे. बी.ए. अॅनिमेशन आणि बेब डिझायनिंग तृतीयचा. अविनाश गाढवे या विद्यार्थ्याने 78.04/- गुण घेऊन विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहूमान प्राप्त केला आहे, तर याच परीक्षेत कु. वेदिका स्वामी या विद्यार्थिनीने 76.73% गुण घेऊन विद्यापीठात सर्वद्वितीय आली आहे. तसेच कु. लक्ष्मी दुर्ग या विद्यार्थिनीने 76.50% गुण प्राप्त करून विद्यापीठात सर्वतृतीय येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. बी.ए. तृतीय वर्षाच्या कु. संजीवनी आकोसकर या विद्यार्थिनीने 89.49% गुण घेऊन विद्यापीठात सर्वतृतीय येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड, तसेच डॉ. रमेश पारवे, डॉ. रामेश्वर खंदारे, डॉ. दयानंद शिरूरे, अॅडमिनीस्ट्रेशनचे समन्वयक डॉ. सुभाष कदम व सहकारी, बी.ए. अॅनिमेशन विभागाच्या प्रमुख प्रा. दुर्गा शर्मा व त्यांचे सहकारी तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.