ज्ञानदीप अकॅडमी येथे भारतीय सैन्यदलातील (आर्मी) सैनिकाचा सत्कार

ज्ञानदीप अकॅडमी येथे भारतीय सैन्यदलातील (आर्मी) सैनिकाचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी अहमदपूरचा विद्यार्थी राहुल सुर्यवंशी यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात (आर्मी ) मध्ये निवड झाली असुन तो सागर येथे रूजु होऊन सुट्टीवर आला असता त्याने अकॅडमीला भेट दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे म्हणाला की मी अगदी कमी  वयामध्ये सैन्य दलात भरती झालो ते फक्त ज्ञानदीप अकॅडमीचे  मार्गदर्शन, क्लासेस आणि मेजर सरांची ग्राऊंडची प्रॅक्टिस करून घेण्याची पद्धत यामुळे मी इतक्या कमी वयात भरती झालो. माझी हलाखीची परिस्थिती होती मी नोकरी साठी पैसे देवू शकत नव्हतो.पण ज्ञानदीप अकॅडमी ही यवढ्या कमी पैश्यात (फक्त जेवणा साठी पैसे घेते) त्यामुळे मी या अकॅडमीत एडमिशन घेतले व फक्त 8 महिन्यामध्येच भरती झालो पण कोरोना मुळे माझी लेखी परीक्षा लांबली व ती नोहेंबर मध्ये झाली व मी परीक्षेत पात्र ठरलो.अकॅडमीचे खूप खूप आभार. फक्त स्वतः वर विश्वास ठेवा आणि मन लावून तयारी करा यश मिळवणे काही अवघड नाही मी पहिल्याच भर्ती मध्ये यशस्वी झालो. माझे लक्ष आर्मी होते तरी पण मी पोलीस भरतीची पण तयारी करायची माझा गोळा आऊट ऑफ होता. ज्ञानदीप अकॅडमीचा हाच फायदा आहे की तुम्ही कोणती पण परीक्षेची तयारी करू शकता. 
अध्यक्षिय समारोप अकॅडमीचे संचालक  उध्दव इप्पर यांनी केला.अकॅडमीच्या वतीने राहुल सुर्यवंशी याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Author