जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी विशेष पथकाची स्थापणा

जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी विशेष पथकाची स्थापणा

अहमदपुर (गोविंद काळे) : लातुर जिल्ह्यात अवैध धंद्यांना अक्षरशः ऊत आला आहे. त्यावरनियंत्रण ठेवण्यासाठी लातुर पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी तसेच अवैध धंद्यावर प्रतिबंध, कार्यवाही करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलंदार यांचे पोलीस पथक स्थापण करण्यात आले आहे.

सदर विशेष पोलीस पथकास लातुरचे मा.पोलीस अधिक्षक यांनी जिल्हातील अवैध धंदे जसे विनापरवाना दारुची चोरटी वहातुक करणे, दारु बाळगणे ईत्यादीसह मटका, जुगार, क्रिकेट सामण्यांवर सट्टा लावणे, विनापरवाना पत्यांचे क्लब चालवणे अश्या प्रकारच्या अवैध धंदा चालकावर कडक कार्यवाही करुन प्रतिबंध करण्याचे निर्देश दिले आहेत.

चौकट:
१. अवैध धंद्यावर नियंत्रण मिळवण्याच्या अनुशंगाने स्थापण करण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकाने २६ डिसेंबर ते २६ जानेवारी या एक महिण्याच्या कालावधीत जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे टाकुन एकुण ३९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. त्यामध्ये कारवाही करण्यात आलेल्या ईसमांची एकुण संख्या १०५ इतकी असुन ५३ लाख १६ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२. सदर कार्यवाहीत दारुबंदी अधिनियम अंतर्गत एकुण २९ गुन्हे दाखल करण्यात आले असुन ३१ इसमांवर कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यावाहीत एकुण २६ लाख १२ हजार १११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत एकुण २० गुन्हे दाखल करण्यात आले असुन ७४ इसमांवर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीत एकुण २७ लाख ४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

About The Author