बाळा पवार दोन वर्षासाठी तडीपार : पुणे पोलीसांची कारवाई
पुणे (रफिक शेख) : शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे ऋषिकेश उर्फ बाळा नितीन पवार वय – 29 वर्षे, रा. 409 शिवाजीनगर गावठाण शिवाजी नगर पुणे. यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1)( अ)( ब) नुसार पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 1 पुणे शहर यांनी पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. सदर आरोपी वर 03 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई ही मा. प्रियांका नारनवरे पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 पुणे शहर व मालोजीराव पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलीमा पवार, विक्रम गौड पोलीस निरीक्षक (गुन्हे), रामदास मुंडे सहाय्यक पोलिस निरिक्षक, किसन राठोड पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई राहुल होळकर, पोलीस शिपाई नागरे, पोशी ढमढेरे यांनी केली आहे.