भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

पुणे (रफिक शेख) : पुण्यातील लोणीकंद गावात दि. 9 फेब्रुवारी रोजी सचिन शिंदेची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी सचिन शिंदे हा लोणीकंद गावातील मुख्य रस्त्यालगत उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार करुन तेथून पळून गेले. सचिन शिंदे च्या मानेजवळ गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सचिन शिंदेवर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पुण्यातील शिक्रापूर आणि रांजणगाव एम आय डी सी भागामध्ये त्याची मागील काही वर्षांपासून दहशत होती. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. सचिन शिंदे हा लोणीकंद परिसरात गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

About The Author

error: Content is protected !!