पोलीसांची दमदार कामगीरी; सात दुचाकीसह एका आरोपीस अटक

पोलीसांची दमदार कामगीरी; सात दुचाकीसह एका आरोपीस अटक

अहमदपूर (गोविंद काळे) : पोलीसांनी दमदार कामगीरी करत नुकतेच रात्रीची गस्त घालत असताना अहमदपूर लातुर रोडवरील मुंढे पेट्रोल पंपावर संशयरित्या पेट्रोल भरण्याकरीता मोटार सायकल घेऊन जात असताना एका आरोपीस अटक करण्यात आली व त्याच्याकडून सात मोटार सायकल जप्त करण्यात करण्यात आल्या असुन पुढील तपास अहमदपूर पोलीसांकडून केला जात आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, पोलीस स्टेशन अहमदपुर येथे नेमणुकीस असलेले सहायक पोलीस निरिक्षक दुरपडे , यांच्या सोबत पोकॉ नारायण बेबडे असे दोन पोलीस कर्मचारी दिन 22 जुलै रोजी 02.30 वाजण्याचे सुमारास शहरात रात्रीच्या गस्तीवर असताना एक ईसम संशयरित्या मोटार सायकल ढकलत नेत असताना अहमदपूर लातुर रोड वरील स्वराज हॉटेलचे बाजुचे मुंढे यांचे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी घेवुन जात असताना दिसला सदर इसमास त्यांचे ताब्यातील मोटार सायकलची विचारपुस केली असता सदर इसमाने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल बाबपुराव धोत्रे वय 24 वर्ष रा. दवणहिपरगा ता . देवणी असे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांचे ताबेतील मोटार सायकल ही कृपा सदन इंग्लीश स्कुल लातुर येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले वरून सदर इसमास पोलीस स्टेशन अहमदपुर येथे गुरन 180/2022 कलम 379 भादवी या गुन्हयात अटक करून पीसीआर घेवुन तपास करता केला असता आरोपीकडुन एक मोटार सायकल व ईतर 06 असे एकुण 07 चोरी केलेले मोटार सायकली मिळुन जप्त करण्यात आल्या. त्यापैकी 01 पल्सर, 01 शाईन, 01 पेंशन प्रो कर्नाटक, उदगीर हद्दीतुन 02 शाईन गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतुन व 01 शाईन विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदरचा आरोपी हा पीसीआर मध्ये असुन आणखी तपास सुरू आहे अशी माहीती पोलीसांनी दिली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!