अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे चंदे परिवाराला 11 हजारांची मनसे मदत
अहमदपूर (गोविंद काळे) : “चला देऊ मदतीचा हात कोविडने मृत्यू पावलेल्या रुग्ण कुटुंबाच्या जीवनात” यानुसार सताळा येथील कोविड महामारीत मृत्युमुखी पडलेल्या देविदास रंगराव चंदे यांच्या कुटुंबाला मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी घरपोच 11 हजारांची मदत मनसे मदत केली व छोटासा मदतीचा आधार अडचणीतील चंदे परिवाराला दिला.अद्याप डॉ भिकाणे यांनी शेडोळ, मानखेड,सोनखेड,पाटोदा,कोपरा,चाकूर,सताळा या सात गावी अडचणीतील शेतकरी व शेतमजूर यांना प्रत्येकी आकरा हजार रुपयांची मनसे मदत करत योगदान दिले आहे.यावेळी दत्तात्रय खंदाडे, सुरेश जाधव,रघुनाथ मुंडे,विश्वनाथ कलशेट्टी,अतिष गायकवाड, उल्हास पाटील,बसवराज होणराव आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.