महात्मा फुले महाविद्यालयास डॉ. बळीराम पवार यांच्याकडून आवळ्याची रोपे भेट
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाकरिता किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बळीराम पवार यांनी आवळा या रोपांची भेट किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी तसेच सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना भेट दिले. याबाबतचे सविस्तर होत असे की, डॉ. बळीराम पवार यांची अहमदपूर तालुक्यात वृक्षप्रेमी म्हणून ओळख आहे. त्यांनी महात्मा फुले महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाकरिता आयुर्वेदाचा राजा म्हणून ओळख असलेल्या आवळा रोपांची वृक्ष लागवडीसाठी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे, सहसचिव माधवराव पाटील, कोषाध्यक्ष नामदेवराव चामले मामा तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पृथ्वीराज पाटील एकंबेकर, अॅड.विशाल पाटील शिरोळकर, मधुकरराव पाटील गुरुजी तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना भेट दिले. यावेळी उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे व एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांची उपस्थिती होती.