सुनेगाव(शेंद्री)शेनी ग्रुप ग्रामपंचायतवर महीलाराज
सरपंच पदी उषा जायभाये तर उपसरपंच पदी चंद्रकला ढाकणे यांची बिनविरोध निवड
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील सुनेगाव(शेंद्री)शेनी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा गोपीनाथ जायभाये तर उपसरपंच पदी चंद्रकला मारोती ढाकणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव(शेंद्री) शेनी येथील सात सदस्य संख्या असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीत राम जायभाये, गोविंद जायभाये, गोपीनाथ जायभाये यांच्या ग्रामविकास नवनिर्माण पँनलला पाच जागेवर विजय मिळाला होता. दरम्यान आज बुधवार दि. १० फेब्रुवारी सकाळी १० वाजता निवडणुक निर्णय अधिकारी एस बी मुसने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंच, उपसरपंच पदासाठी एक-एकच अर्ज आल्याने सरपंच पदी उषा गोपीनाथ जायभाये तर उपसरपंच पदी चंद्रकला मारोती ढाकणे यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी एस बी मुसने यांनी दुपारी ०२:०० वाजता सांगीतले.
यावेळी तलाठी आर. के सोनवणे,ग्रामसेवक एस.व्हि बिरादार किनगाव पोलीस स्टेशन बिट अमलदार महेबुब सय्यद आदी उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर फटाके फोडुन नुतन सरपंच उषा जायभाये उपसरपंच चंद्रकला ढाकणे ग्रामपंचायत सदस्य आरती बेले, भास्कर गित्ते,माधव होळकर आदी पदाधिकारी यांच्यासह भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक(आर्मी) विष्णु जायभाये यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.