जुगार अड्ड्यावर छापा; 2,10,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
लातूर (कैलास साळुंके) : लातूर तालुक्यातील बोरवटी येथे तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या ईसमांना लातूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत नऊ जणांना ताब्यात घेतले असून रोख रकमेसह दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असलेल्या बोरवटी शिवारामध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून लातूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या पथकाने तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या दादासाहेब सुरेश रणखांब (वय 32), कृष्णा सुखदेव माने (वय30), सय्यद लतीफ महेबुब (वय 22), आप्पासाहेब सुरेश रणखांब (वय 30), बालाजी अंगद सगर (वय 27), संतोष व्यंकटराव ढमाले (वय 34), कुलदीप व्यंकट कांबळे (वय 21) त्यापैकी दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांची नावे मनोज राजाराम इडेकर व बालाजी राजाराम इडेकर सर्व रा. बोरवटी यांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोटारसायकल असे एकूण 2,10,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे. सदरची कारवाई लातूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस अंमलदार महेबुब तांबोळी, विनोद लखनगिरे, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, चालक दाजिबा यादव यांनी काम पाहिले.