अहमदपूर शहरातील अतिक्रमण हटवा अन्यथा रस्ता रोको

अहमदपूर शहरातील अतिक्रमण हटवा अन्यथा रस्ता रोको

मनसेचा तहसीलदारांना इशारा

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील शिवाजी चौक,मेन रोड अहमदपूर व तिपन्ना नगर येथील अतिक्रमणे हटवा अन्यथा सोमवारी शिवाजी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रास्ता रोको करेल असा इशारा मनसेने जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर तहसीलदारांना दिला आहे.शहरातील नागरीक महानगरपालिकेला टॅक्स भरत असतानाही छोट्या मोठ्या पावत्या फाडून प्रशासन जनतेच्या व वाहनधारकांच्या हक्काचा रस्ता अतिक्रमण धारकांना देत आहे.यामुळे शिवाजी चौक व अहमदपूर मेन रोड वर महिला,आबालवृद्धांना रस्त्याने धड चालताही येत नाही.तसेच वाहनांना पार्किंग नो पार्किंग बोर्ड लावून शिस्त लावणे गरजेचे आहे.तसेच तिपन्ना नगर येथील हटवलेले अतिक्रमण परत जोमात झाले आहे.तरी ही सर्व ठिकाणची अतिक्रमने हटवून त्या अतिक्रमण धारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन गरजेचे आहे जेणेकरून त्यांची उपजीविका ही चाले व शहरातील जनतेलाही त्रास होणार नाही.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवारी 15/2/21 रोजी दुपारी 1 वाजता शिवाजी चौक येथे रस्ता रोको करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी दिला आहे.या वेळी तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे,शहराध्यक्ष अतिष गायकवाड, मदन पलमटे,उत्तम मुरकुटे,अमोल कसले, विठ्ठल पंडगे,सुभाष कांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author