यशवंत विद्यालयात महामानवांना अभिवादन

यशवंत विद्यालयात महामानवांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्याध्यापक व्ही.व्ही. गंपले यांच्या हस्ते दोन्हीही प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वप्रथम शिंदे तनुजा अंबादास , द्वितीय वाघमारे अपूर्वा दत्ता तर तृतीय राऊत्रे प्राची रविशंकर तर उत्तेजनार्थ म्हणून फड विश्वास लक्ष्मण याना मुख्याध्यापकांच्या हस्ते मेडल पुष्पहार सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी श्री गंपले म्हणाले की लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जीवन व कार्य यांच्यावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांना जीवनात शिस्त, अभ्यास, स्वच्छता व प्रामाणिकपणा महत्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून मराठी विभाग प्रमुख रामलिंग तत्तापुरे, एन सी सी विभागप्रमुख अशोक पेदेवाढ व हिंदी विभागाचे प्रमुख प्रवीण मोरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर व्ही पाटील यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author