बालाघाट पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बालाघाट पॉलिटेक्निक रुद्धा- अहमदपूर येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा-2022 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये सिव्हिल विभागातून प्रथम वर्षात चव्हाण योगेश 76.53 %, कांबळे दिक्षा 70.63%, कांबळे शुभांगी 70.11% तसेच द्वितीय वर्षात मुंडे रेश्मा 82.25 %, सुरवसे महेश 58.25% पठाण अजमल खान 54.75% व तृतीय वर्षांमध्ये आजगावकर योगेश 79.56% साबळे अमित78.11%, जाधव दुर्गादास 77.44% मेकॅनिकल विभागातून प्रथम वर्षात बिरनाळे कपिल70.80%, फूलसे वीरेंद्र62.75, पांचाळ आदित्य 60.25% द्वितीय वर्षात बोडके राजरत्न 70.63%, माने पवन 69.63, खटके विशाल 69.50% व तृतीय वर्षात राजे वैभव 66.67%, पवार नारायण58.40%, कुंडगीर धीरज 54.80, इलेक्ट्रिकल विभागामध्ये प्रथम वर्षात टिळक आदित्य71.25%, काळे शिवदास 70.00%, सुरनर अश्विनी 68.75%, द्वितीय वर्षात नवटके वैभव 71.73%, यचाळे महादेवी 70.00%, थडवे रोहिणी 67.00%, तृतीय वर्षात गुंठे राजश्री 76.78%, नारागुडे शुभम 75.72%, कराड मोतीराम 75.00% कम्प्युटर विभागांमधून प्रथम वर्षात कुरेशी फैजान 80.63%, खुरेशी शहबाज 79. 50%, सूर्यवंशी प्रणाली 78.31%, तृतीय वर्षांमध्ये दामा पवन 81.31% असे गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संस्था सचिव तथा महिला जिल्हा अध्यक्ष भाजपा प्राचार्य रेखाताई तरडे, संचालक अमरदीप हाके, प्राचार्य स्वप्नील नागरगोजे, सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.