घरकूल योजनेच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी गटविकास अधिकारी यांना साकडे
अहमदपूर (गोविंद काळे) : तालूक्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत प्रलंबीत असलेल्या घरकूल योजनेला गती द्यावी तसेच गायरान अथवा शासकीय जागेवर अतिक्रमीत असलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अतिक्रमण नियमानूकूल करावे ही प्रमुख मागणी घेवून युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिशिष्टमंडळाने येथील गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड यांची भेट घेवून चर्चा केली.
आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकूल योजना साकारली जावू शकते.परंतू गावोगाव स्थानिक राजकारणामुळे घरकूलासाठी आवश्यक ती कागदपत्रे मस्त नाहीत.बहुतांश ठिकाणी शासकीय जागेवर/गायरानावर अतिक्रमण करून कच्चे घरे बांधून नागरीक रहात आहात.अशा लाभार्थ्यांना घरकूलाचा प्राधान्याने लाभ देण्याची गरज आहे.सर्वांसाठी घरे ही प्रधानमंत्री यांची संकल्पना असून यासाठी शासन निर्णय सूध्दा जारी करण्यात आला असून तालुकास्तरावरील समितीने याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे अशी विनंती या प्रसंगी युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केली.
या वेळी पंचायत समितीचे कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, पत्रकार अजय भालेराव, ज्ञानोबा गायकवाड, नागनाथ वाघमारे,त्र्यंबक नामपल्ले, उत्तम भावे, मूरलीधर हरगीले, एकनाथ तेलंगे मोघा येथील शिष्टमंडळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.