माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
अहमदपूर (गोविंद काळे) : मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे यांना नूकताच जीवनगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चलो बुद्ध की ओर अंतर्गत व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा नूकताच वाराणसी सारनाथ येथे आयोजित करण्यात आला होता. वाराणसी सारनाथ येथे आयोजित केलेल्या या शानदार सोहळ्यास त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उच्च तिब्बती शिक्षण संस्थेचे कुलपती डॉ.गेशे डवड समतेनजी हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमारजी,उत्तर प्रदेश कार्यवाह डॉ.वीरेंद्र जयस्वाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बब्रूवानजी खंदाडे यांनी सरपंच ते राज्याचे आमदार असा दमदार प्रवास करत जनसेवा केलेली आहे.आपल्या कार्यकाळात सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अतुलनीय सेवा केल्या बद्दल ‘एम्स आयडॉल- जीवनगौरव’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देवून गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.