विलास युनिट 2 कारखान्याच्या मिल रोलर चे पूजन

विलास युनिट 2 कारखान्याच्या मिल रोलर चे पूजन

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 म. तोंडार तालुका उदगीर या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2022- 23 करिता मिल रोलर चे पूजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांच्या हस्ते कारखान्याचे संचालक, निमंत्रित संचालक व कार्यकारी संचालक ए आर पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पुढील गाळप हंगामासाठी आवश्यक ती यांत्रिक व पूरक कामे पूर्णत्वास येत असून येणाऱ्या गळीत हंगामात अधिकाधिक क्षमतेने उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी लागणारी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणे सोबत करार करण्यात आले असून सदरील यंत्रणेस ऍडव्हान्स चे वाटप करण्यात आले आहे. अशी ही माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांनी दिली आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नियोजनाखाली कारखान्याचे संस्थापक राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 ची वाटचाल चालू आहे.

या कारखान्याचे रोलर पूजन कार्यक्रमास कार्यकारी संचालक ए. आर. पवार ,संचालक अनंत बारबोले, गुरुनाथ गवळी, अमित पाटील, निमंत्रित संचालक रामराव बिरादार, सिद्धेश्वर पाटील, विजय निटूरे, विनोबा पाटील गुडसूरकर, राजेंद्र पाटील तोंडारकर, मनमथ आप्पा किडे, मारुती पांडे, विनोद सुडे यांच्यासह कारखाना आधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!