प्रभाग आठ मधील रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांची मागणी

प्रभाग आठ मधील रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील अंतर्गत रस्त्याचे बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या निमित्ताने खड्डे करण्यात आले होते. त्यापैकी काही खड्डे बुजवण्यात आले, मात्र विसरून काही खड्डे तसेच राहिले आहेत. ते अद्यापही तसेच आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून दुचाकी, चार चाकी घेऊन चालणे कसरतीचे झाले आहे. प्रभाग क्रमांक आठ मधील चिल्लरगे गल्ली भागात महेश झुंगास्वामी यांच्या घरासमोरील रस्त्यावरील तीन रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर मध्यभागी एक खड्डा खोदलेला आहे. जवळपास एक वर्ष पूर्ण झाले तरी त्या खड्ड्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. आता प्रशासकीय काळात हा खड्डा बुजऊन रस्ता सुरळीत करावा.
जेणेकरून किरकोळ अपघात होणार नाहीत. अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांना केली आहे. याप्रसंगी अजय शेटकर, रितेश हो, अखिल मोमीन, प्रसन्न पांढरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!