उदगीर तालुक्यात दुहेरी खून, तिसरा गंभीर जखमी!

उदगीर तालुक्यात दुहेरी खून, तिसरा गंभीर जखमी!

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील हेर येथे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात दोघांचा खून, या भांडणात एक गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना या जनतेने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या दरम्यान घडल्याचे सांगितले जाते. मात्र उदगीर ग्रामीण पोलिसांनी सदरील घटना आठ वाजता घडल्याचे सांगितले. हेर शिवारातील मयत गोविंद माधव जगताप, नितीन पावडे हे दोघे मयत झाले. तर भगवान जगताप गंभीर जखमी आहे. यासंदर्भात फिर्यादी जनाबाई बाळासाहेब बिरादार यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात तक्रार दिल्यानंतर सदरील तक्रारीची दखल घेऊन गुन्हा रजिस्टर नंबर 63 /21 कलम 302, 307, 341, 323, 504, 143, 147, 148, 149 भारतीय दंड विधान संहिता सहित कलम 25, 4 शस्त्र अधिनियम 1959 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या प्रकरणात आरोपी बालाजी माधव जगताप, अंकुश बालाजी जगताप, लहु बालाजी जगताप, फुलाबाई बालाजी जगताप, सोजरबाई विश्वंभर ढगे, पूजा लहू जगताप, अश्विनी  जगताप, पंडित बापूराव पाटील सर्व राहणार हेर तालुका उदगीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, शेतीच्या वाटणीचा कारणावरून शिवीगाळ करून आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीच्या चुलते गोविंद जगताप यांच्या डोक्यात, तोंडावर, कुर्‍हाडीने वार केले व आरोपी क्रमांक 1 व 3 यानी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईक भांडण सोडवून जखमी गोविंद जगताप यास दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघाले असता होवगी बुद्रे यांच्या शेताजवळ आरोपी क्रमांक 1, 2,3 हे मोटर सायकल पाठीमागून येऊन व गावाकडून आरोपी क्रमांक चार हातात कत्ती ,आरोपी क्रमांक पाच तिने हातात वीळा, आरोपी क्रमांक सहा हातात लोखंडी गज, आरोपी क्रमांक सात हिने हातात काठी घेऊन फिर्यादी व फिर्यादीचे जखमी नातेवाईक यांची वाट आढवून शिवीगाळ करून फिर्यादीतचा  भाऊजी नितीन फावडे यासह आरोपी तिस याने तलवारीने मारून जखमी केले. व फिर्यादीचे वडील भगवान जगताप याचे उजव्या हाताच्या मनगटावर आरोपी क्रमांक एक याने लोखंडी गदा मारून जखमी केले. तसेच आरोपी क्रमांक दोन यांनी डाव्या हातावर, पाठीमागे, ओठावर कुर्‍हाडीने वार करून जखमी केले. आरोपी क्रमांक चार ते सात यांनी फिर्यादीचे वडीलास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक एक ते सात यांनी आरोपी क्रमांक आठ यांचे सांगण्यावरून शेतीच्या वाटणीचे कारणावरून फिर्यादीचे चुलते! भाऊजी यांना ठार मारले व फिर्यादीचे वडीला जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले .वगैरे तक्रारी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. असे असले तरी संपूर्ण तालुक्यात प्रश्न पडला आहे की सकाळी आठ वाजता घडलेल्या या गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांना अधिक माहिती घेऊन गुन्हा दाखल करायला रात्रीचे आठ वाजले आहेत.

 ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दरम्यान जर तात्काळ पोलिसांनी कारवाई केली असती तर जनप्रक्षोभ कमी झाला असता. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या खून, दरोडे, बलात्कार, मारामाऱ्या असे प्रकार वाढले असून पोलीस प्रशासनाचा दबाव कमी झाला असल्याचे सर्रास बोलले जात आहे.

 उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत हैबतपुर येथे घडलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात उदगीर शहरात तणाव निर्माण झाला होता, आणि या मध्येच पोलिसांच्या विरोधात जनक प्रक्षोभ निर्माण झाला होता. या सर्व घटनेला ग्रामीण पोलिस जबाबदार असताना देखील शहर पोलिस स्टेशनचे अत्यंत अनुभवी आणि कर्तबगार पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांची बदली झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी या घटनेबद्दल आणि पोलिस प्रशासनाच्या निर्णयाबद्दल तर्कवितर्क लढवण्यात येत होते. बदलीचा अधिकार प्रशासनाला असला तरीही चोर सोडून संन्यासाला फाशी होऊ नये. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसातून निर्माण होत आहे.

About The Author