गंजगोलाईतील बॅरिकेट्स हटावसाठी भाजपा युवा मोर्च्यातर्फे “स्वाक्षरी मोहिम”

गंजगोलाईतील बॅरिकेट्स हटावसाठी भाजपा युवा मोर्च्यातर्फे “स्वाक्षरी मोहिम”

व्यापार्‍यांना दुहेरी फटका : हजारो व्यापार्‍यांची उलाढाल 60 टक्क्यानी घटली, व्यापारी संकटात

लातूर (प्रतिनिधी) : कोरोणाच्या पार्श्‍वभूमिवर शहरातील गंजगोलाई, भूसार लाईन, सराफ लाईन परिसरात महानगरपालिकेने बॅरिकेट्स बसविल्याने कोरोणाचे प्रमाण आटोक्यात आले. परंतु लॉकडॉऊन संपला तरी गंजगोलाईतील बॅरीकेट्स तसेच ठेवण्यात आल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अगोदर कोरोणाचे संकट आणि आता बॅरिकेट्समुळे व्यापार्‍यांना 60 टक्के फटका बसलेला आहे. तरीही महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे व्यापार्‍यावर दुकान बंद करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे गंजगोलाई व परिसरातील बॅरिकेट्स काढून व्यापार्‍यांची सोय करावी. अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल, असा ईशारा भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर याच्या उपस्थितीत मनपा आयुक्‍तांना निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
लातूर शहरातील गंजगोलाई, भूसार लाईन, कापड लाईन, सराफ लाईन परिसरात महानगरपालिकेच्यावतीने कोरोणाच्या पार्श्‍वभूमिवर बॅरिकेट्स बसविले परंतु आता कोरोणानंतरही बॅरिकेट्स तसेच ठेवल्यामुळे व्यापार्‍यांना व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस जागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये व्यापार्‍यांच्या अडचणी जाणून घेवून तसेच स्वाक्षरी मोहिम राबवून 9 व 10 फेब्रुवारी 2021 रोजी महानगरपालिका आयुक्‍तांना निवेदन देण्यात आले. तसेच गंजगोलाई व परिसरातील बॅरिकेट हटाव या मागणीसाठी शहरातील व्यापार्‍यांना भेटून स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. व्यापार्‍यांच्या हिताच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला व्यापारी व नागरिकातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या कामी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, महेश कौळखेरे, नगरसेविका भाग्यश्री कौळखेरे, भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेश सचिव गणेश गोमचाळे, राजू आवस्कर, संजय गिर, गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोष ठाकूर, गजेंद्र बोकन, प्रकाश काळे, वैभव डोंगरे, किशोर शिंदे, काका चौगुले, धनु आवस्कर, आफ्रिन खान, रविशंकर लवटे, संतोष तिवारी, ओम धरणे, दुर्गेश चव्हाण, योगेश गंगणे, मनोज गोजमगुंडे, राहुल बुकटे, गणेश श्रीमंगले, पृथ्वीराज कुरे पाटील, महादु पिटले, चेतन फिस्के, आलिशयर शेख, अमर पाटील, आकाश पिटले, श्रीकांत दुबे, सुयश पंपटवार, श्रीनाथ सावकार, शैलेश हुंडीवाले, कल्पेश असोपा, ऋषिकेश बट्टेवार, गणेश गवळी, पंकज भोले, गोविंद सुर्यवंशी, तिगिले, श्रीनाथ सावकार, रमेश बिराजदार, धिरज चिंलवार, धर्मेंद्र दर्डा, विश्‍वजीत वेदपाठक, डी.एम.पाटील, गजानन जाधव, ए.यु.सोळुंके, भुषण परंडेेकर, संजय सोनवटक्के, विकास चामे, बबु्रवान गव्हाणे, मनोज जाधव, महेश बिर्ले, रवि जाधव, व्हि.जे.पोकर्णा, महेंद्र दुरूगकर,देविदास यन्‍नावार, आनंद कामदार, शेज नजीब, शेख फरीद, दिपक उकंडे, मनोहर टाक, मन्मथ टेकाळे, गिरीशप्पा गारटे, सौरभ रूईकर, राजेश गोडबोले, वैभव माने, शेख युसुफ, ओंकार हांदराळे, नानासाहेब काळे, नितीन जाधव, अंकुश जाधव, एस.पी.खंडेलवाल, योगेश ईटकर, अक्षय हाके, दिपक घोलप, कदीर सय्यद, कल्याण जामुनकर, प्रशांत लोखंडे, गौतम कटके, ज्ञानेश्‍वर कैले, जावेद पटवेकर, विठ्ठल चिलमे, सचिन मोहिते, दिपक मोहिते, सिंदलिंग खंदार, संतोष जाधव, संतोष केंगार, श्रीकृष्ण कोलपुके, पवनराजे पाटील, वैभव शहाणे, संभाजी पोतदार, अजय बोकन, ज्ञानेश्‍वर निटुरे, प्रशांत वर्मा, तानाजी घायाळ, सुमित वर्मा, सतीश साळुंके, गोंविंदलाल वर्मा, तुळशीराम कोले, नामदेव पाटील, दिपक दिक्षीत आदींनी पुढाकार घेतला असून या मोहिमेला व्यापार्‍यांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

बॅरिकेट्स बाबत आठ दिवसात निर्णय घेऊ – आयुक्‍त मित्तल

कोरोणाच्या पार्श्‍वभूमिवर गंजगोलाईतील कापड लाईन, भूसार लाईन या भागातील व्यापार्‍यांशी चर्चा करून बॅरिकेट्समुळे व्यापार्‍यांना 60 टक्के फटका बसत असल्याचे समोर आलेले आहे. याबाबत भाजपा युवा मोर्च्यातर्फे युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी आयुक्‍तांशी संपर्क साधला असता गंजगोलाईतील बॅरिकेट्स बाबत व्यापार्‍यांशी चर्चा करून येत्या आठ दिवसात योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्‍वासन लातूर महानगरपालिकेचे आयुक्‍त अमन मित्तल यांनी दिलेले आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे.

About The Author