तिर्थक्षेत्र विकास निधीतून दावणमलीक बाबा दर्ग्याचे काम सुरू होणार – भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

तिर्थक्षेत्र विकास निधीतून दावणमलीक बाबा दर्ग्याचे काम सुरू होणार - भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील शेरा येथील दावणमलीक बाबा दर्ग्याचे काम निधीअभावी बंद करण्यात आले होते. तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी मंजूर झाला असूनही काम बंद असल्याचे गावातील ग्रामस्थांनी शेरा दौर्‍यावर आलेले भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना सांगताच त्यांनी तात्काळ सबंधीत कार्यकारी अभियंत्याशी दुरध्वणीद्वारे बोलणे केले. आणी सबंधीत अधिकार्‍यांनी तिर्थक्षेत्र विकास निधीतून दावणमलीक बाबा दर्ग्याचे काम लवकरच सुरू करू, असे आश्‍वासन दिले त्यामुळे बर्‍याच दिवसापासून रखडलेले दावणमलीक बाबा दर्ग्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा विश्‍वास भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी ग्रामस्थांशी बोलताना दिला.

यावेळी जननायक संघटनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, प्राचार्य आर.एस.अवस्थी, उपप्राचार्य मारूतीराव सुर्यवंशी, तसेच शेरा येथील दर्ग्याचे अध्यक्ष शेख चाँदपाशा, तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष कल्याण सदाशिव भुरे, , शेरा गावचे सरपंच साहेबराव कांबळे, अ‍ॅड.सिकंदर शेख, उत्तम भुरे,गजानन भुरे, रेणापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे संचालक सुग्रिव भुरे, जालिंदर भुरे, शेज जाफर गुलाम, शेख शलिम, नंदकिशोर बांगड,सोसायटीचे चेअरमन अंकुश लोंडे, डॉ.बांगड, शिवाजी तळेकर, प्रदीप भुरे, कृष्णा भुरे, शेख सुबोधीन, शेख अल्‍लाउद्दिन, शेख नदिब रसुल, बालाजी भुरे, ग्रा.प.सदस्य प्रताप भुरे, आकाश भुरे, तात्या सोनवणे, दादा भोसले, बिभिषण लाडे, पंढरीनाथ कांबळे, शाम बांगड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी दावणमलीक बाबा दर्ग्याला भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या शुभहस्ते गलब चढविण्यात आला. यावेळी रेणापूर तालुक्यातील निवाडा, शेरा, पळशी आदी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कृषी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केेंद्र शासनाच्या पाठीशी शेतकर्‍यांनी उभे रहावे. दरम्यान शामसुंदर बांगड यांच्या निवास्थानी थांबले असता कृषी कायद्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली असता कृषी कायद्याबाबत माहिती देतांना केंद्र शासनाने लागू केलेले तीन्ही कृषी कायदे शेतकरीहिताचे व राष्ट्रहिताचे आहेत. तरीही या कायद्यांना विरोधासाठी विरोध म्हणून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. परंतू असे आंदोलन करणे चुकीचे आहे. या कायद्यामध्ये काही प्रमाणात दुरूस्ती करण्यासाठी शासन तयार आहे. या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शेतकर्‍याचे उत्पन्‍न चौपटीने वाढणार आहे. त्यामुळे देशहितासाठी आंदोलनकांनी या आंदोलनातून माघार घेवून कृषी कायद्याला सक्रिय पाठींबा देवून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी शेरा येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना केले.

About The Author