पाटील परिवाराचे माजी आ.कव्हेकरांकडून सांत्वन

पाटील परिवाराचे माजी आ.कव्हेकरांकडून सांत्वन

लातूर (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील माजी राज्यमंत्री बस्वराज पाटील यांच्या मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील (वय 89 वर्ष) यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुरूम येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देवून पाटील कुटुंबियाचे सांत्वन केले. यावेळी माजी राज्यमंत्री बस्वराज पाटील मुरूमकर, गणपतराव पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील उपस्थित होते.
यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके,माधव गायकवाड आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!