डी.पी.बसविण्याच्या नावाखाली शेतकर्यांची सुरू असलेली लुबाडणूक थांबवा – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात चालु वर्षामध्ये पाऊस समाधानकारक झालेला आहे. यामुळे परिसरातील विहीरी बोअर व तलावालाही पाणी आलेले आहे. त्यामुळे शेतकरी रब्बीच्या पीकाला पाणी देण्याच्या धावपळीत आहेत. लाईटचा लपंडाव कायमस्वरूपी असल्याने शेतकरी कधी रात्री तर कधी दिवसा पीकाला आठ-आठ तास पाणी देतो अनेकांच्या मोटारी चालु असल्यामुळे ट्रान्सफार्मवर जास्तीचा लोड येऊन ट्रान्सफार्मर जळत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. परंतु महावितरणला माहिती देऊनही ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम वेळेमध्ये केले जात नाही. परिणामी या कामासाठी शेतकर्याकडून जास्तीचे पैसे घेऊन लुबाडण्याचे काम महावितरणकडून होत आहे. त्यामुळे डी.पी.बसविण्याच्या नावाखाली शेतकर्यांची लुबाडणूक थांबवा अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिला.
अनेकवेळा परिसरातील शेतकर्याच्या शेतातील डी.पी.जळाला तर त्यातील ट्रान्सफार्मर रिपेअर करून बसविण्यासाठी एम.एस.ई.बी.चे कर्मचारी हजारो रूपयांची मागणी करीत आहेत. व पैसे घेतल्याशिवाय कुठलाही डी.पी. बसविला जात नाही. तर एका बाजुला शेतीपंपाचे विज बील माफ करण्याऐवजी त्याच बीलाची सक्तने वसुली केली जात आहे. त्याशिवाय वेगळे पैसे बिगरपावती घेतले जात आहे. असाच प्रकार लातूर तालुक्यातील गोंदेगाव शिवारात समोर आलेला आहे. येथील गुणाबाई देशमुख डी.पी. बसविण्यासाठी शेतकर्यांची थकबाकी भरून घेतली त्याशिवाय 28 हजार रूपये दिड महिण्यापुर्वी बगरपावती घेतले. त्याच गावातील मुळक डी.पी.दुरूस्तीसाठी वीजबिल वेगळे व 32 हजार रूपये घेतले. याची पावती अद्यापही त्याला दिली नाही. तसेच साई येेथे नवीन डी.पी.बसविण्यासाठी 2 लाख रूपये खर्च येईल, अशी मागणी एम.एस.ई.बी. अधिकार्याकडून केली जात असल्याची तक्रार मुख्य अभियंता कोलप साहेब व अधिक्षक अभियंता,लातूर भोले यांच्याकडे केली. या गैरव्यवहाराची चौकशी करून शेतकर्यांची लुबाडणूक करणार्या कर्मचार्यावर कार्यवाही करावी. व तसेच मागणी करणार्या शेतकर्यास त्वरीत डी.पी. देण्याची मागणी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली.
शेतकर्यांच्या विजबिलासाठी लाईट तोडणे थांबवावे
याबाबत एम.एस.ई.बी.चे सी.ई. यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना लेखी कार्यवाहीची मागणी करणार आहोत. डी.पी.पुरवठ्यामध्ये सुरळीतपणा आणावा व शेतकर्याचे वीजबिलासाठी लाईट तोडणे थांबवावे. अन्यथा या महावितरणच्या कृतीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिलेला आहे.