दोन हजाराची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

दोन हजाराची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

फॉर्मवर स्वाक्षरी करण्यासाठी मागितली लाच

निलंगा (भगवान जाधव) : तालुक्यातील अंबुलगा (बु.) ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक वैजीनाथ मोहन चात्रे (वय 39) रा. हानमंतवाडी ता. निलंगा व पाणीपुरवठा सेवक ग्रामपंचायत अंबुलगा (बु.) दत्ता शिवाजी सूर्यवंशी (वय 35) यांनी तक्रारदार यांच्या घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या फॉर्मवर स्वाक्षरी करतो म्हणून ग्रामसेवक यांनी दोन हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. मिळालेल्या माहितीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांनी यशस्वी सापळा रचत दि.12 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय अंबुलगा (बु.) येथे पाणीपुरवठा सेवक दत्ता शिवाजी सूर्यवंशी यांच्यामार्फत दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उप अधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी यांनी काम पाहिले.

About The Author