१५ फेब्रुवारी हा दिवस उत्सव म्हणून साजरा करा – आजेश जाधव
महागाव (राम जाधव) : १५ फेब्रुवारी सतगरू सेवालाल महाराज जयंती असून हा दिवस गोर समाज बांधवानी एक उत्सव म्हणून साजरा करा असे आवाहन गोर सेनेचे तालुका अध्यक्ष आजेश जाधव यांनी केले.
गत वर्षी कोरोणा लॉकडाऊनच्या पार्स्वभुमीवर सन उत्सव करण्यावर मोठया प्रमाणात मर्यादा आल्या होत्या. त्यामूळे समाज बांधवाचा हिरमोड झाला होता. कोरोणा प्रतिबंधक लस उपलब्द झालेली असली तरी अध्याप कोरोणाचे संकट दुर झालेले नसल्याने कोरोना बाबत काळजी घेणे आवश्यक असून नागरीकांनी १५ फेब्रुवारी रोजी घराघरावर पांधरा ध्वज लावावा. शक्य होईल त्यांनी नवीन वस्त्रे परीधान करावी, विशेष बाब म्हणून या दिवशी विविध व्यसणाचा त्याग करण्याचा संकल्प करावा. आधुनीक वाद्य न लावता पारंपारीक वाद्ये वाजवून उत्सव साजरा करावा.
सतगरु सेवालाल महाराजाचे चारीत्र वाचन करून आदर्श त्याचा घ्यावा. यासाठी प्रत्येक गाव तांड्यातील नायक, कारभारी, हसाबी, नसाबी, डायसाळे व तांड्यातील तरून मंडळीनी पुढाकार घेऊन एक गाव एक जयंती असा उपक्रम साजरा करण्यासाठी सर्व नागरीकांना एकत्र आणून उत्सव साजरा करावा असे आवाहन आदेश जाधव यांनी केले आहे.