‘विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा’ च्या निनादाने अहमदपूर शहर दुमदुमले
फुले महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्यांचे वाटप करून रॅलीचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झेंड्याचे वितरण करून अहमदपूर शहरातून ‘वंदे मातरम्….’,’भारत माता की जय…’, ‘जय जवान जय किसान…’, ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा… झेंडा उंचा रहे हमारा…’ च्या निनादाने काढण्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येऊन शहर दुमदुमले. याबाबतची सविस्तर वृत्त असे की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरोघरी तिरंगा लावण्यासाठी तिरंगा झेंड्याचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या शुभ हस्ते तिरंगा रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
अहमदपूर शहरातून काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीमध्ये प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्यासह उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार समाजशास्त्रीय विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी मानले.