यशवंत कॉलेज मध्ये वेलकम समारोह संपन्न

यशवंत कॉलेज मध्ये वेलकम समारोह संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा वेलकम समारोह संपन्न झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत कॉलेज येथे आज दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता अकरावी कला, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा वेलकम समारोह संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.व्ही.गंपले हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत कोटा पॅटर्न चे प्रमुख शेख सर उपप्राचार्य प्रा. घोरबांड गिरीधर, प्रा. सय्यद एम. यु. हे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. विश्वंभर स्वामी हे उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रा. डॉ.कारामुंगीकर बालाजी, प्रा. रवी ति ईरफळे, प्रा. तोंडारे दिनेश, प्रा. येलमटे सुरेंद्र, प्रा. शिवशंकर चिद्रे यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते .

यावेळी उपप्राचार्य पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रा. घोरबांड गिरीधर व पीएच.डी.पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. कारामुंगीकर बालाजी यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. स्वामी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कधीही नकारात्मक विचार डोक्यात आणू नयेत. सदैव सकारात्मक विचार डोक्यात ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये यशवंत कॉलेजची मुलं वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. म्हणून अकरावीच्या सर्व मुलांना सांगणे आहे की जिद्द, सातत्य आणि चिकाटीच्या माध्यमातून अविरत अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य गंपले म्हणाले की, अकरावी कला, विज्ञान शाखेत प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ष आराम करायचे वर्ष नसून मेहनत करण्याचे वर्ष आहे. बरेच मुलं आणि पालकही असं समजतात की अकरावीचे वर्ष म्हणजे रेस्ट इयर असतं विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्षापासूनच चांगली तयारी करावी. शिक्षण सोडण्याचे कारण गरिबी होऊ शकत नाही. प्रसंगी कोणतंही काम करण्याची गरज भासली तरी विद्यार्थ्यांनी न लाजता काम करून कशाप्रकारे चांगलं शिक्षण घेता येईल याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी उपप्राचार्य घोरबांड सर, प्रा. सय्यद सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांमधून कु. पटवारी दुर्गा, मंडले आरती, शेख महेक, दुर्गे सिद्धी प्रेमचंद, डावरे साक्षी अविनाश, प्रतीक्षा गुरुनाथ मुस्तापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. काबलिया वैष्णवी, गायकवाड हर्षदा, होनराव कोमल यांनी गीत गायले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. पटवारी दुर्गा, कदम सानिका, कुरील कोमल, काबलिया वैष्णवी यांनी स्वागत गीत गायले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सय्यद आलिया मुक्रम यांनी केले . तर आभार गुरदळे साक्षी यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख निशात युनुस, सय्यद अख्तर, सय्यद अफान, बनसोडे रोहिणी, सायली शरद घाटोळ, नळंदवाड तनुजा, शेख इफत, रड्डेवाड चैताली यासह अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author