महाविद्यालयीन तरुणींना कायद्याचे ज्ञान असणे नितांत आवश्यक – अॅड. ज्ञानेश्वर हाक्के
शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रासेयो विभाग, सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान सत्रात चाकूर न्यायालयाचे विधीज्ञ, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर हाक्के बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘आठरा वर्ष वयाखालील मुलींच्या सर्वांगीण हक्काचे रक्षण पोक्सो कायद्याने होते. शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही मुलींना कायद्याचे ज्ञान असणे नितांत गरजेचे आहे. शालेय, महाविद्यालयातील तरुणींना बालविवाहाबाबत कायद्यात असलेल्या तरतुदीची माहिती असणे आवश्यक आहे. पोटगीच्या बाबतीत असलेल्या कायदेशीर तरतुदी, वडिलांच्या संपत्तीत मुलींचा समान वारसा हक्क, कौटुंबिक हिंसाचार आणि स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने भारतीय कायद्यात विविध तरतुदी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो विभागाचे प्रा. एजाज पठाण यांनी केले तर प्रास्ताविक आणि पाहुण्याचा परिचय सांस्कृतिक विभागाचे डॉ. गोविंद काळे यांनी करून दिला. तर आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. नारायण कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. डी. जी. माने, उपप्राचार्य व्यंकट कीर्तने उपस्थित होते. तर प्रा. डॉ. विलास कांबळे, प्रा. डॉ. सौ. मंथा पी. पी., प्रा. डॉ. गोरख कोरे, प्रा. दत्ता कानवटे, प्रा. तुळशीदास म्हेत्रे, नागेश सरवदे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.