स्वामी विवेकानंद महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 130 वी जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शन
शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 130 वी जयंती ग्रंथालय दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य द. मा. माने, सैदापुरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतीय जनतेच्या मनात वाचनसंस्कृती रुजावी यासाठी ग्रंथालयाची उपयुक्तता अधिक असल्याचे रंगनाथन यांनी स्पष्ट करून भारतीय समाजात ग्रंथालयांची अधिकाधिक उपलब्धता करून देण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने, उपप्राचार्य व्यंकट कीर्तने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी तर आभार ग्रंथपाल डॉ. के. के. तेलगाणे यांनी व्यक्त केले.