भारतीयांनी स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी प्रत्येकांनी अग्रेसर व्हावे – डॉ. बब्रुवान मोरे

भारतीयांनी स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी प्रत्येकांनी अग्रेसर व्हावे - डॉ. बब्रुवान मोरे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण मागील वर्षभरापासून साजरे करत आहोत. तर, या ७५ वर्षात भारताने खूप काही मिळविले परंतु आता त्या स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी अग्रेसर व्हावे असे स्पष्ट प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर च्या राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग व क्रीडा विभाग तसेच पंचायत समिती अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘स्वराज्य महोत्सव ‘ या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर विचार मंचावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रमुख मार्गदर्शक डॉ. बब्रुवान मोरे व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. पांडुरंग चिलगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, भारताने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली असून भारत जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. या महाशक्तीचा उपयोग भारताने जनकल्याणासाठी केला पाहिजे, त्यातूनच खरे सुराज्य निर्माण होईल. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेम जागृत होणे आवश्यक आहे. तिरंगा ही आपली आन-बान शान आहे. त्याचं पावित्र्य राखणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि घरोघरी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण होणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक. कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author