कुठल्याही पक्षाचा जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे एवढा काम करत नाही त्यांना विधानसभेत पाठवा – संतोषभाऊ नागरगोजे

कुठल्याही पक्षाचा जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे एवढा काम करत नाही त्यांना विधानसभेत पाठवा - संतोषभाऊ नागरगोजे

अहमदपूर (गोविंद काळे) : येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणूकविषयी मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे,सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांचा मार्गदर्शन दौरा असल्याकारणाने मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी अहमदपूर विश्रामगृह येथे मनसेचा पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. अहमदपूर मध्ये सर्वत्र पक्षाचे फलक लागल्याने शहर मनसेमय झाल्याचे दिसत होते. यावेळी बोलताना मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असतात त्या लढा व जिंका असे सांगत मी तुमच्यासोबत आहे असे सांगितले.राज्य सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांनी अहमदपूर हा आगामी काळात मनसेमय होईल करण डॉ. नरसिंह भिकाणे हे सातत्याने एवढी आंदोलने, काम करतात तेवढे तर मनसे सोडा जिल्ह्यातील कुठलाही जिल्हाध्यक्ष करत नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या कामाच्या जोरावर सामोरे जा जिंका व डॉ भिकाणे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी त्यांचे हात मजबूत करा असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी येणाऱ्या काळात अहमदपूर मनसेचा गढ बनवणार असा निर्धार बोलून दाखवला. त्यानंतर मनसे नेत्यांनी भिकाणे टॉवर येथील मनसे कार्यालयाला भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यश भिकाणे यांनी केले.

यावेळी नवनियुक्त शेतकरी सेनेचे राज्यउपाध्यक्ष भागवत शिंदे, जिल्हाउपाध्यक्ष शिवाजी भंडारे, प्रदीप शेळके, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण चौहान,तालुकाध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी, सुरेश शेवाळे, शहराध्यक्ष उमेश रेड्डी आदी उपस्थित होते. मनवीसे तालुकाध्यक्ष अतिष गायकवाड, जय गायकवाड, अहमदपूर तालुकासचिव मदन पलमटे, अहमदपूर तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील, उल्हास पाटील, विकास सूर्यवंशी, अहमदपूर विभागाध्यक्ष गजानन पांगरे,चंदे,संतोष नारागुडे,तुकाराम कासले, चाकूरहून तुळशीदास माने, बसवराज होणराव, शहराध्यक्ष नरसिंग गुंतापल्ले, नरसिंग शेवाळे, कृष्णा गिरी, निलंगा विभागाध्यक्ष राजेंद्र लोंढे, नवाज पठाण आदीसह अनेक कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्तिक भिकाणे यांच्या टीमने मनवीसे मध्ये प्रवेश केला.

About The Author