लातूर स्काऊट गाईड कार्यालय यांच्या वतीने 75 फुट लांब व 50 फुट रुंद राष्ट्रध्वज जिल्हा क्रीडा संकुलावर 7500 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गायले ध्वजासह सामूहिक राष्ट्रगीत

लातूर स्काऊट गाईड कार्यालय यांच्या वतीने 75 फुट लांब व 50 फुट रुंद राष्ट्रध्वज जिल्हा क्रीडा संकुलावर 7500 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गायले ध्वजासह सामूहिक राष्ट्रगीत
लातूर स्काऊट गाईड कार्यालय यांच्या वतीने 75 फुट लांब व 50 फुट रुंद राष्ट्रध्वज जिल्हा क्रीडा संकुलावर 7500 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गायले ध्वजासह सामूहिक राष्ट्रगीत

लातूर :  येथील जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता क्रीडा संकुल लातूर येथे 75 फुट लांब व पन्नास फूट रुंदीच्या राष्ट्रध्वजाचे सादरीकरण करण्यात आले . यामध्ये 7500 विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभाग नोंदला .भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 फूट लांब व पन्नास फुट रुंदीच्या राष्ट्र ध्वजाचे सादरीकरण शनिवारी क्रीडा संकुलावर करण्यात आले . हा महाकाय राष्ट्रध्वज सिल्क  कपड्यातला होता . भारत सरकारने सांगितलेल्या नियमानुसारच राष्ट्रध्वजाची मांडणी , रचना करण्यात आली होती . भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध सामाजिक जनजागृती अभिमान राबविण्यात येत आहे . सादरीकरणापूर्वी सकाळी साडेआठ वाजता टाऊन हॉल येथून 7500 विद्यार्थ्यांसह ढोल , ताशा, लेझीम , झांज पथकासह पारंपारिक वेशभूषित विद्यार्थी सहभागी झाले होते . हा लक्षवेधी राष्ट्रध्वज सादरीकरण कार्यक्रम करण्यासाठी लातूर भारत स्काऊट आणि गाईड कर्यालयाने  पुढाकार घेतला  होता . 7500 स्काऊट ,गाईड , रोहर रेंजर यांनी हाती ध्वज घेऊन भारताचा नकाशा तयार करून राष्ट्रगीत गायले.  हे विहंग चित्र पाहण्याचा आणि साक्षीदार होण्याचा योग लातूरकरांना आला.

मानवी साखळीत असलेला भारताचा नकाशा 75 00 स्काऊट , गाईड , रोहर रेंजर क्रीडा संकुलावर सकाळी दहा वाजता मानवी साखळीतला भारत देशाचा नकाशा सादरीकरण केला . त्यानंतर सामूहिक राष्ट्रगाण करण्यात आले . हे दृश्य पाहण्यासारखे होते .हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे , जिल्हा संघटन संघटक डॉ .शंकर चामे आदीसह स्काऊट व गाईड कॅप्टन उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमास लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, महाराष्ट्र राज्य भारत आणि गाईड्स राज्यसंस्थेचे सचिव नागेश मोठे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, डायट चे प्राचार्य गिरी सर, शिक्षण विस्तार अधिकारी मिरकले, सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती,
सदरील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमास सरळ हाताने मदत करणारे मनीष बोरा, तुकाराम पाटील, जय भुतडा, श्रीमती सीमा रेनापुरकर, शिवाजी पोतदार, प्रसाद सुवर्णकार, संभाजी माळी, आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्ष चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लातूर भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाचे डॉक्टर शंकर चामे, श्रीमती मुधोळकर, सचिन सुरवसे, आबा जोगदंड, धोंडीराम पाटील, सोमनाथ भातांगळे, राजेंद्र जाधव, श्रीमती जया कुंकेवार आदींनी परिश्रम घेतले.

About The Author